Thursday, August 16, 2012

निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..


शिर्डी वरून परत येताना बस मध्ये माझ्या सीट च्या मागे बसलेला एक बावळट मुलगा.. विंडो बंद करायला लावली का तर म्हणे थंडी वाजतेय..
मस्त हिरवेगार माळरान.. मस्त हिरवे फुललेले शेत..
त्यात मधेच गायी-वासर, मेंढर-बकऱ्या चरतात..
मधूनच वाहणारे झुळझुळ झरे.. रिमझिम पडणारा पाऊस.. 
अंगावर शहरा आणणारा थंडगार वारा..
मनं हरवायला लावणारा मोहमयी निसर्ग सौन्दर्य पहाव अन त्यात हरवून जावं कि थंडी लागतेय म्हणून गुपचूप बसावं..
कशी ही माणस रे देवा.. निसर्गाला फील करायचं सोडून स्वतःला जपत बसलीत..
निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..






Monday, July 16, 2012

चूक..


कधी कधी जीवनात एक अशी वेळ येते की आपल्याला खूप आधी केलेली चूक समजते..
अन ती चूक सुधारावी वाटते पण जेव्हा ती चूक कळते ती वेळ खूप वाईट असते..
कारण ती चूक सुधरायला गेलो तर अनेक चुका घडण्याची शक्यता असते..
आशा वेळी आधीची चूक चुकच ठेवण चांगल असत..
भले ती चूक असली तरी.. :(


-वैशाली ओटवणेकर 

Monday, November 28, 2011

असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..



आज हि आम्ही आधी सारखा अनेकदा भांडतो..
फरक फक्त एवढाच कि तो आधी प्रेमाने मनवायचा मी रागावल्यावर..
आता फक्त एवढच बोलतो..
"तू अजूनही तशीच आहेस अन कायम तशीच राहा.. माझ्याशी बोलताना तरी..
कारण भांडण हि एकच गोष्ट आहे ज्यामुळे तूझी नेहमी मला आठवण येते.."
हे ऐकून मला रडूच नाही आवरले..
न त्याच्या वरचा राग विसरले..
असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..

-वैशाली ओटवणेकर