Tuesday, November 20, 2012

आठवणींचा डब्बा..!


काही मनातले विचार..
काही रंगवलेली स्वप्न..
काही निरागस प्रश्न..
काही न मिळाली उत्तरं..!

काही मनात तयार केले चित्रं..
कधी रंगात रंगवलेले..
कधी बिन रंगाचे..
आठवणी अशाच असतात रंगेबिरागी..
आपणच रंग भरायचे असतात ..
कधी स्वतःच्या तर कधी दुसऱ्याच्या रंगवायच्या ..!

आठवणींचा डब्बा उघडाच असतो..
क्षण निसटून गेले कि तो बंद होत असतो..
त्याची उघड झाप चालूच असते..

आठवणींचा डब्बा..!
आठवणीच्या डब्ब्याला रेशीम गाठि ने बांधाव..
कारण आठवणीचा डब्बा म्हणजे स्वतःच स्वतःला दिलेले जीवनाची भेटवस्तू आहे..!
-वैशाली (०८-११-२०१२)


0 comments:

Post a Comment