Thursday, August 16, 2012

निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..


शिर्डी वरून परत येताना बस मध्ये माझ्या सीट च्या मागे बसलेला एक बावळट मुलगा.. विंडो बंद करायला लावली का तर म्हणे थंडी वाजतेय..
मस्त हिरवेगार माळरान.. मस्त हिरवे फुललेले शेत..
त्यात मधेच गायी-वासर, मेंढर-बकऱ्या चरतात..
मधूनच वाहणारे झुळझुळ झरे.. रिमझिम पडणारा पाऊस.. 
अंगावर शहरा आणणारा थंडगार वारा..
मनं हरवायला लावणारा मोहमयी निसर्ग सौन्दर्य पहाव अन त्यात हरवून जावं कि थंडी लागतेय म्हणून गुपचूप बसावं..
कशी ही माणस रे देवा.. निसर्गाला फील करायचं सोडून स्वतःला जपत बसलीत..
निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..