Monday, November 28, 2011

असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..आज हि आम्ही आधी सारखा अनेकदा भांडतो..
फरक फक्त एवढाच कि तो आधी प्रेमाने मनवायचा मी रागावल्यावर..
आता फक्त एवढच बोलतो..
"तू अजूनही तशीच आहेस अन कायम तशीच राहा.. माझ्याशी बोलताना तरी..
कारण भांडण हि एकच गोष्ट आहे ज्यामुळे तूझी नेहमी मला आठवण येते.."
हे ऐकून मला रडूच नाही आवरले..
न त्याच्या वरचा राग विसरले..
असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..

-वैशाली ओटवणेकर