Sunday, February 25, 2018

कृती विचार अन् स्वभाव

पाहुणे घरी येणार तेव्हा आपण आपले घर निटनिटके ठेवणे यालाच दिखावा करणे म्हणतात.. अशी लोक दिखावा करण्यात महान असतात.. या उलट जी लोक आपले घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवतात त्यांना दिखावा करण्याची गरज नसते.. पाहुणे कधी पण आले तरी त्यांना घर स्वच्छच दिसणार.. तसच माणसाणे आपल्या कृती विचार अन् स्वभाव ठेवावा..

-वैशाली (26-02-2014)

Tuesday, November 20, 2012

आठवणींचा डब्बा..!


काही मनातले विचार..
काही रंगवलेली स्वप्न..
काही निरागस प्रश्न..
काही न मिळाली उत्तरं..!

काही मनात तयार केले चित्रं..
कधी रंगात रंगवलेले..
कधी बिन रंगाचे..
आठवणी अशाच असतात रंगेबिरागी..
आपणच रंग भरायचे असतात ..
कधी स्वतःच्या तर कधी दुसऱ्याच्या रंगवायच्या ..!

आठवणींचा डब्बा उघडाच असतो..
क्षण निसटून गेले कि तो बंद होत असतो..
त्याची उघड झाप चालूच असते..

आठवणींचा डब्बा..!
आठवणीच्या डब्ब्याला रेशीम गाठि ने बांधाव..
कारण आठवणीचा डब्बा म्हणजे स्वतःच स्वतःला दिलेले जीवनाची भेटवस्तू आहे..!
-वैशाली (०८-११-२०१२)


Thursday, August 16, 2012

निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..


शिर्डी वरून परत येताना बस मध्ये माझ्या सीट च्या मागे बसलेला एक बावळट मुलगा.. विंडो बंद करायला लावली का तर म्हणे थंडी वाजतेय..
मस्त हिरवेगार माळरान.. मस्त हिरवे फुललेले शेत..
त्यात मधेच गायी-वासर, मेंढर-बकऱ्या चरतात..
मधूनच वाहणारे झुळझुळ झरे.. रिमझिम पडणारा पाऊस.. 
अंगावर शहरा आणणारा थंडगार वारा..
मनं हरवायला लावणारा मोहमयी निसर्ग सौन्दर्य पहाव अन त्यात हरवून जावं कि थंडी लागतेय म्हणून गुपचूप बसावं..
कशी ही माणस रे देवा.. निसर्गाला फील करायचं सोडून स्वतःला जपत बसलीत..
निसर्गाला जप.. निसर्ग तुम्हाला आपोआप जपेल..


Monday, July 16, 2012

चूक..


कधी कधी जीवनात एक अशी वेळ येते की आपल्याला खूप आधी केलेली चूक समजते..
अन ती चूक सुधारावी वाटते पण जेव्हा ती चूक कळते ती वेळ खूप वाईट असते..
कारण ती चूक सुधरायला गेलो तर अनेक चुका घडण्याची शक्यता असते..
आशा वेळी आधीची चूक चुकच ठेवण चांगल असत..
भले ती चूक असली तरी.. :(


-वैशाली ओटवणेकर 

Monday, November 28, 2011

असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..आज हि आम्ही आधी सारखा अनेकदा भांडतो..
फरक फक्त एवढाच कि तो आधी प्रेमाने मनवायचा मी रागावल्यावर..
आता फक्त एवढच बोलतो..
"तू अजूनही तशीच आहेस अन कायम तशीच राहा.. माझ्याशी बोलताना तरी..
कारण भांडण हि एकच गोष्ट आहे ज्यामुळे तूझी नेहमी मला आठवण येते.."
हे ऐकून मला रडूच नाही आवरले..
न त्याच्या वरचा राग विसरले..
असे कसे हे त्याचे मला न मनवताही मला मनवणे..

-वैशाली ओटवणेकर